News Flash

‘खतरो के खिलाडी ११’च्या सेटवर ‘या’ अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये 'खतरो के खिलाडी ११'चे चित्रीकरण सुरु आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये 'खतरो के खिलाडी ११'चे चित्रीकरण सुरु आहे. (Photo Credit : Varun Sood Instagram)

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘खतरो के खिलाडी ११’ च्या सेटवरून स्पर्धक आणि अभिनेत्री अनुष्का सेन करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका स्टंटचे चित्रीकरण करत असताना एक दुर्घटना झाली आहे. या वेळी अभिनेता वरुण सूद गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर डॉक्टरांनी त्याला ३-४ दिवस आराम करण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शूट दरम्यान वरुण एक धोकादायक स्टंट करत होता. त्यावेळी सेटवर तज्ञही उपस्थित होते. स्टंट करत असताना वरुण खाली पडला आणि त्याला दुखापत झाली. वरुण खाली पडल्याने त्याच्या हाताला जखम झाली. वरुणचा हात लगेच सुजला आणि त्याला भयंकर वेदना ही झाल्या, अशा परिस्थितीत त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासातच त्याला बरे वाटू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Sood (@varunsood12)

डॉक्टरांनी वरुणला तीन-चार दिवस आराम करण्यास सांगितला आहे. आता पूर्णपणे ठीक झाल्यानंतर वरुण पुढेचं शूटिंग करू शकतो. या शोचे सुत्रसंचालन दिग्दर्शक रोहित शेट्टी करतो. वरुणसोबत झालेल्या या अपघातानंतर सेटवर जास्त काळजी घेतली जातं आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये या ‘खतरो के खिलाडी ११’चे चित्रीकरण सुरु आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

‘खतरो के खिलाडी ११’ आधी वरुण ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक होता. वरुण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो केप टाउनमधून इतर स्पर्धकांसह अनेक वेळा फोटो शेअर करताना दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 4:16 pm

Web Title: varun sood injured on the sets of khatron ke khiladi 11 in cape town rushed to hospital dcp 98
Next Stories
1 ‘मिस वर्ल्ड असल्याचं डोक्यात ठेवून काम…’; भन्साळींनी सांगितला होता ‘हम दिल दे चुके सनम’मधील किस्सा
2 “एक मित्र म्हणून मी फक्त…”, ‘यासाठी’ सतीश कौशिक यांनी प्रेग्नंट नीना गुप्ता यांना केलं होतं प्रपोज
3 ३२ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान करणार पहिल्यांदाच बायोपिक?
Just Now!
X