29 February 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2 : शिवानीसोबतच्या वादानंतर वीणाने मागितली माफी

'बिग बॉस मराठी'च्या घरात मंगळवारपासून शिवानी आणि वीणामध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे.

शिवानी सुर्वे, वीणा जगताप

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मंगळवारपासून शिवानी आणि वीणामध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे. शिवानीबद्दल जे काही वीणा बोलली त्यावर माफी मागण्यासाठी वीणाने दोन दिवस घेतले. आता मला तिची माफी नको, मी पण तिच्याबद्दल बोलणार, कारण मी आत येताना तिच्याबद्दल माहिती काढून आले आहे असे शिवानीचे म्हणणे आहे.

वीणाच्या अशा बोलण्याने माझ्यापेक्षा जास्त माझे आई बाबा दुखावले आहेत, खूप चुकीचा मेसेज जातो बाहेर, असे शिवानीने घरातील सदस्यांना सांगितले. या वादात शिवने मध्यस्ती केली आणि शिवानीला समजावण्याचा प्रयत्न केला. वीणा माफी मागायला तयार आहे तर तू विषय नको वाढवूस असं शिव शिवानीला म्हणाला. त्यावर तू मध्ये नको पडूस असं शिवानी म्हणताच वाद वाढतच गेला.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घराबाहेर होणाऱ्या टीका, ट्रोलिंगबाबत शिवानी म्हणते..

या संपूर्ण वादावर शिव, वीणा, अभिजीत आणि वैशालीमध्ये चर्चादेखील झाली. त्यानंतर बिग बॉसने शिवानी आणि वीणाला कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतलं. बिग बॉसने दोघींना सूचना दिली की, या घरात घराबाहेरील वैयक्तिक गोष्टींवरून शेरेबाजी करण्यास सक्त मनाई आहे आणि अशी चूक पुढे दोघींकडून घडणार नाही अशी आशा आहे. त्यानंतर शिवानीच्या सांगण्यावरून वीणाने शिवानीच्या आई वडिलांची आणि अजिंक्यची माफी मागितली.

First Published on July 17, 2019 3:18 pm

Web Title: veena jagtap apologises after dispute with shivani surve bigg boss marathi 2 ssv 92
Next Stories
1 ‘पतंजली’वर विनोद केल्यामुळे जावेद जाफरी ट्रोल
2 ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘AGENT 007’
3 हेमा मालिनी यांच्या त्या ट्विटवर धर्मेंद्र यांनी मागितली माफी
X
Just Now!
X