29 November 2020

News Flash

लवकरच येणार ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वेल, ही असणार स्टाराकास्ट?

चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

‘वीरे दे वेडिंग’ हा चित्रपट बॉलिवूडमधील काही गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाचा आता सीक्वेल येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात कोणत्या अभिनेत्री दिसणार हे देखील निर्मात्यांनी ठरवले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार करीना कपूरच्या डिलिव्हरीनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहेत. वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या सीक्वेलसाठी सेम स्टार कास्ट ठेवण्यात येणार आहे. करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली होती. लव्ह, लग्न आणि लोचामध्ये अडकलेल्या या चार मैत्रिणींच्या कथेने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार हे ऐकून चाहते आनंदी झाले असून त्यांची चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:57 pm

Web Title: veere di wedding 2 shooting to begin after kareena delivery second child avb 95
Next Stories
1 नागराज मंजुळे झाले पोस्टमन; घेऊन येतायेत प्रेक्षकांसाठी ‘तार’
2 बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; उपचारासाठी मागतोय १० लाखांची मदत
3 KGF 2: रवीना टंडन साकारणार ‘ही’ भूमिका