News Flash

‘वीरे दी..’मधल्या ‘या’ सीनवर दुबईच्या सेन्सॉर बोर्डाची कात्री!

काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. त्यामुळे हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकला नाही.

वीरे दी वेडिंग

चार मैत्रिणींची कथा सांगणा-या ‘वीरे दी वेडिंग’ नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या तो बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देऊन प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरी त्याच्या मार्गातील संकट काही संपायचं नाव घेत नाही. काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. त्यामुळे हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकला नाही. यातच आता नवी भर पडली असून पुन्हा एकदा या चित्रपटातील काही सीनवर कात्री चालविल्याचे सांगण्यात येत आहे.

शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ या  चित्रपटाचे कथानक स्वच्छंदीपणे आयुष्य जगणा-या चारजणींभोवती फिरताना दिसून येतं. या चित्रपटामध्ये स्वरा भास्कर, करिना कपूर, सोनम कपूर आणि शिखा तस्लानिया या अभिनेत्री झळकल्या असून त्यांनी त्यांच्या परीने चित्रपटाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या चित्रपटामध्ये काही अपशब्द आणि बोल्ड सीनचा वापर करण्यात आला आहे. यामुळेच चित्रपटातील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवून त्याच्या प्रदर्शिनाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे.

‘वीरे दी..’मध्ये स्वरा भास्करवर काही बोल्ड सीन चित्रीत करण्यात आले आहेत. स्वराच्या याच  बोल्ड सीनमुळे दुबईतील सेन्सॉर बोर्डाने या सीनवर कात्री चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हे सीन अतिरंजकपणे चित्रीत करण्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट येथे जरी प्रदर्शित झाला तरी येथील प्रेक्षकांना स्वराचे बोल्ड सीन पाहता येणार नाहीत.

दरम्यान, स्वरा कायमच तिच्या बिंधास्त बोलण्यामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा चर्चेत आली आहे. इतकचं नाही तर या चित्रपटात तिने साकारलेलं हस्तमैथुनाचं दृश्य हे पूर्णपणे आक्षेपार्ह आणि लज्जास्पद असल्याचं अनेकांनी म्हणत आपली मतं मांडली होती. यावर स्वराची बाजू घेत या वादात तिच्या आईने इरा भास्कर यांनी प्रतिक्रिया देत टिकाकारांची बोलती बंद केल्याचं  नुकतंच पाहायला मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:01 pm

Web Title: veere di wedding swara bhasker bold scene cut censor board
Next Stories
1 हॉलिवूडपटापेक्षा दीपिकाला स्वत:चं लग्न महत्त्वाचं?
2 Sanju : ‘संजू’मधील नर्गिस यांची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
3 रजनी द बॉस…’काला’ चित्रपट पाहण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून चाहत्यांची थिएटरबाहेर गर्दी
Just Now!
X