हॉलिवूडमधील सिनेमांमध्ये कायमच नवीन कथानक, साहसी दृष्ये यांचा मिलाप केलेला असतो. याप्रमाणेच या सिनेमांचे ट्रेलर, टिझर देखील आकर्षक असतात. सध्या हॉलिवूडमध्ये अशाच एकाच सिनेमाच्य़ा ट्रेलरची चर्चा होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला कमी कालावधीत सर्वात जास्त व्ह्युज मिळाल्य़ाचे सांगण्यात येत आहे.
‘वेनम’ असे या सिनेमाचे नाव असून हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून केवळ दोनच दिवसांमध्ये २ कोटी व्ह्युज मिळाले आहेत. हा ट्रेलर केवळ २ मिनीटे ४३ सेकंदाचा असून लोकांनी त्याला पसंती दिल्याचे दिसून येते.
या सिनेमामध्ये टॉम हार्डी, मिशेल विलियम्स आणि रिज अहमद हे झळकणार आहे. प्रदर्शित झालेला व्हिडिओमध्ये एक्शन आणि थ्रिलरने भरलेला आहे. हा व्हिडिओ स्ट्रीमिंग साईटवर तिस-या स्थानावर असून त्याला ८लाखापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. तर स्पायडर मॅनची भूमिका टोफर ग्रेस याने वठवली आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टरही रिलीज झाले होते त्यालाही प्रेक्षकांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला होता.