News Flash

‘मारी’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन

चेल्लादुरई हे ८४शी वर्षाचे होते.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुषच्या ‘मारी’ या चित्रपटामध्ये कमालीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुरई अय्या यांचे गुरुवारी निधन झाले. काल २९ एप्रिल रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. चेल्लादुरई हे ८४ शी वर्षाचे होते. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

त्यांच्या मुलाने त्यांना बाथरुममध्ये बेशद्ध अवस्थेत पाहिले. माहितीनुसार, आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार विधी होणार आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेसृष्टीतील तज्ञ रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जेष्ठ अभिनेते चेल्लदुराई अय्या यांचे चेन्नईत काल संध्याकाळी निधन झाले…त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” अशा आशयाचे ट्वीट केले आहे.

एवढंच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चेल्लादुरई यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मारी’, ‘थेरी’, ‘शिवाजी’सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:33 pm

Web Title: veteran actor and dhanush s maari co star chelladurai passes away at 84 dcp 98
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना ICUमध्ये हलवले
2 जेव्हा दाऊदने ऋषी कपूर यांना चहासाठी बोलावलं; डॉनच्या भेटीचा ‘तो’ किस्सा
3 ‘ती पुढे निघून गेली आणि मी…’, नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुलासा
Just Now!
X