ज्येष्ठ अभिनेता मॉर्गन फ्रीमॅन याच्यावर जवळपास आठ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सीएनएनने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध करत फ्रीमॅनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला.

फ्रीमॅन याच्यावर त्या महिलांनी आपल्याला परवानगशिवाय स्पर्श करणं, अश्लील वृत्तीने स्पर्श करणं, शरीराच्या काही भागांविषयी अश्लील विधानं करणं, इतकच नव्हे तर भेदक नजरेनं पाहणं आणि स्कर्ट, कपड्यांपर्यंत हात घालणं असे आरोप केले आहेत. प्रॉडक्शन असिस्टंटपासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या इतरही महिलांनी त्याच्यावर हे आरोप केले आहेत. ज्यावेळी मॉर्गनच्या संपर्कात आलेल्या या महिलांशी संपर्क साधला गेला तेव्हा बहुतांश महिलांनी त्याची ही काळी बाजू समोर आणली.

एका खास मोहिमेअंतर्गत सीएनएनने जवळपास १६ महिलांशी संवाद साधला त्यापैकी साधारण आठ महिलांनी मॉर्गनविषयीचे आपले वाईट अनुभव सांगितले. तर इतर आठजणींनी तो आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वागल्याचं स्पष्ट केलं. चित्रपटाच्या सेटवर, प्रमोशनच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान किंवा मग त्याच्या रिव्हिलेशन कंपनी या निर्मिती संस्थेच्या ऑफिसमध्ये हे प्रसंग आपल्यावर ओढावल्याचं स्पष्ट केलं.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

फ्रीमॅनच्या प्रॉडक्शन टीममधील एका महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करत २०१२ मध्ये ‘नाऊ यू सी मी’ या चित्रपटाच्या वेळी त्याने आपलं आणि इतर महिला सहकाऱ्यांचं लैंगिक शोषण केल्याचं स्पष्ट केलं. तर इतरही काही महिलांनी मॉर्गननं आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत काही अश्लील टीप्पणी केल्याचा खुलासा केला.
मॉर्गनविषयी करण्याच आलेल्या या गौप्यस्फोटांमुळे आता हॉलिवूडमध्ये बऱ्याच चर्चांना उधाण आलं असून, पुन्हा एकदा हार्वी विनस्टीन आणि कलाविश्वात होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या मुद्द्याने लक्ष वेधलं आहे.