30 May 2020

News Flash

निधनाच्या अफवांवर मुमताज यांचं स्पष्टीकरण; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या..

काही दिवसांपासून त्यांच्या निधनाच्या अफवांना उधाण आलं होतं.

बॉलिवडूच्या दिग्गज नायिका मुमताज यांच्या निधनाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्या होत्या. परंतु आता खुद्द मुमताज यांनीच एका व्हिडीओद्वारे या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुमताज यांची कन्या तान्या माधवानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “माझी प्रकृत्ती उत्तम आहे. मित्रांनो माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे. पाहा मी अजून जिवंत आहे. लोकं जेवढं म्हणतात तेवढी मी अजून वयस्करही झालेले नाही. तुमच्या प्रार्थनांमुळे मी आजही सुंदर दिसतेय,” असं त्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

तान्या माधवानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत लोकांना अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे. “त्याच्या निधनाच्या अफवा सध्या पसरल्या आहेत. तसंच चाहत्यांना माझ्या आईकडून एक संदेश आहे. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. त्यांचे जे फोटो इंटरनेटवर व्हायरल करून हे वृत्त पसवलं जात आहे ते फार जुने आहेत. त्यावेळी त्या कर्करोगानं ग्रस्त होत्या,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“त्यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि त्या आताही सुंदरच दिसतायत. त्यांना या चर्चांमधून बाहेर काढा. त्या ७३ वर्षांच्या आहेत,” असंही तान्या यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या पोस्टवर मुमताज यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. मुमताज या आपल्या परिवारासोबत लंडनमध्ये राहत आहेत. त्यांना १९७१ मध्ये खिलौना या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 2:31 pm

Web Title: veteran actress mumtaz reaction on her death rumours says i am still alive daughter shares video instagram jud 87
Next Stories
1 पडद्यावरचा खलनायक, प्रत्यक्ष आयुष्यात हिरो ! जयंत पाटलांकडून सोनू सुदचं कौतुक
2 पाकिस्तान विमान अपघातावर बॉलिवूडचं मौन का? अभिनेत्याचा प्रश्न
3 कराची विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलचा मृत्यू
Just Now!
X