23 November 2020

News Flash

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं निधन

'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन.

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं बुधवारी निधन झालं, त्या ८४ वर्षाच्या होत्या. विविध मराठी नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘तुझ्यात जीव रंगला’ या सध्या सुरु असलेल्या मराठी मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. त्या अविवाहित होत्या.

सरोज सुखटणकर यांना रुई (ता. हातकणंगले) येथे मूळ गावी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक नाटकांसाठी महाराष्ट्रभर अनेक दौरे केले. ५० हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या. ‘नर्तकी’ या त्यांच्या गाजलेल्या नाटकाचे ३०० हून अधिक प्रयोग झाले होते. ‘वादळवेल’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. ‘एकटा जीव सदाशिव’, ‘जोतिबाचा नवस’, ‘दे दणादण’, ‘लेक चालली सासरला’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. अलका कुबल यांच्या समवेत त्यांनी ‘धनगरवाडा’ हा शेवटचा चित्रपट केला. ‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केले. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 6:35 pm

Web Title: veteran actress saroj sukhtankar passes away aau 85
Next Stories
1 कोल्हापूर पालिका निवडणूक मुदतीत अशक्य
2 मराठा आरक्षण: महानगरांचा दूध पुरवठा रोखण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
3 राजू शेट्टी करोनामुक्त; पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज
Just Now!
X