हिंदी आणि भोजपुरी अभिनेत्री श्रीपदा यांचे निधन झाले आहे. करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. श्रीपदा यांनी काल, ५ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. श्रीपदा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रीपदा यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान श्रीपदा यांचे निधन झाले आहे. श्रीपदा यांच्या निधनाची बातमी CINTAAचे सरचिटणीस अमित बहल यांनी दिली. “करोनाच्या दुसऱ्या लाटेने आपण बरीच मौल्यवान लोकं गमावली आहेत. बातम्यांमध्ये ज्या लोकांच्या निधनाबद्दल जे काही लिहले जाते, ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण श्रीपदा या आमच्या इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ सदस्य होत्या,” असे अमित बहल म्हणाले.

Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

श्रीपदा यांच्या अभिनयाबद्दल बोलताना अमित म्हणाले, “श्रीपदा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही उत्तम काम केले आहे. दुर्देवाने आम्ही एक अत्यंत जेष्ठ अभिनेत्री गमावल्या आहेत. त्यांच्या आत्माला शांती मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. करोनाच्या दुसऱ्या लाटेने आता कोणाचा जीव घेतला नाही पाहिजे विशेषत: आपल्या चित्रपटसृष्टीतील लोकांचे.”

श्रीपदा यांनी बरीच वर्ष काम केले त्यांचे लाखो चाहते देखील होते. त्यांनी आतपर्यंत ६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. श्रीपदा यांनी १९७८ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी ‘पुराना पुरुष’, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या ‘धर्म संकट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढंच नाही तर श्रीपदा यांनी गोविंदा, धर्मेंद्रसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.