22 September 2020

News Flash

वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत साकारणार कोल्हापूरातील घरंदाज सासू

स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत त्यांनी भूमिका साकारली होती. आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या मालिकेतला त्यांचा घरंदाज सासूचा अंदाज नक्कीच वेगळा ठरणार आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, “१० वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होतोय. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधित्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.”

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही नवी मालिका १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:42 pm

Web Title: veteran actress varsha usgaonkar to feature in upcoming tv show ssv 92
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकण: ईडीकडून समन्स मिळताच गायब असलेली रिया परतली घरी
2 फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का? आता स्वार्थी मुलाच्या भूमिकेसाठी आहे प्रसिद्ध
3 तुला महात्मा गांधी दिसतात का?; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला…
Just Now!
X