01 March 2021

News Flash

लक्ष्यामुळे विजू मामा झाले ‘मोरूची मावशी’ !

या नाटकातील ‘टांग टिंग टिंगाक्’ हे गाणं तर इतकी वर्षे अलटूनही आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे.

'मोरुची मावशी' नाटकासाठी आधी बेर्डे यांनाच विचारण्यात आले होते.

‘मोरूची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेलं नाटक ठरलं. विजय चव्हाण अर्थात सर्वांचे लाडके विजू मामा यांचं या नाटकातील ‘टांग टिंग टिंगाक्’ हे गाणं तर इतकी वर्षे अलटूनही आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. या गाण्यातील बोल, साडीतही अगदी सहजपणे वावरून नाचणारे विजूमामा. त्यांनी घातलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणाराच. या गाण्यानंतर प्रेक्षकांचा वन्समोअर हमखास मिळायचाच.

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला की ते त्याच उत्साहात पुन्हा पिंगा, कोंबडा घालून दाखवायचे. मोरुच्या मावशीची भूमिका अजरामर करणाऱ्या विजू मामांना ही भूमिका मिळाली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळेच. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्ष्या यांच्यासोबत विजय चव्हाण यांनी ‘टुरटुर’ हे नाटक केले होते. त्यामुळे विजू मामांच्या कामाविषयी चांगलीच माहिती त्यांना होती.

VIDEO : ‘टांग टिंग टिंगाक्…’ म्हणणारी ‘मोरुची मावशी’ पाहाच

‘मोरुची मावशी’ नाटकासाठी आधी बेर्डे यांनाच विचारण्यात आले होते. मात्र इतर कामांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मोरूची मावशी करण्यास नकार दिला पण याच वेळी नाटकाचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. लक्ष्मीकांत यांनी सुचवलेली निवड विजय चव्हाण यांनी योग्य ठरवली. समोरून चालत आलेल्या संधीच त्यांनी सोनं करून दाखवलं. हे नाटक रंगभूमीवर येऊन कैक वर्ष उलटली. त्यानंतरही विजू मामांनी अनेक चित्रपटात, नाटकांत काम केलं. मात्र ही भूमिका  प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 1:28 pm

Web Title: veteran artist vijay chavan in moruchi mavshi moruchi mavshi
Next Stories
1 बोल्ड फोटोशूट करणं अमिषाला पडलं महागात
2 ‘या’ कारणामुळे कंगना राहणार अविवाहित?
3 नवाजुद्दीनसाठी मोदींच्या अहमदाबादमध्ये साकारलं पाकिस्तान
Just Now!
X