26 February 2021

News Flash

बॉलिवूडला आणखी एक झटका; जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचं निधन

कधीकाळी तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या कुमकुम काळाच्या पडद्याआड

Film star Kumkum in film DUSHMAN. Express archive photo

५०-६०च्या दशकात तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांचं निधन झालं आहे. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुमकुम यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता जगदिप यांचे सुपुत्र नावेद जाफरी यांनी कुमकुम यांच्या निधनाची बातमी दिली. “आपण आणखी एक रत्न गमावलं आहे. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. त्या आमच्या कुटुंबातील एक सदस्यच होत्या. एक उत्तम व्यक्तीमत्व. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना, कुमकुम आंटी” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रपट निर्माता अनिल शर्मा यांनी देखील ट्विटरद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. “सुंदर आणि प्रतिभाषाली अभिनेत्री कुमकुम यांचं निधन झालं आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

कुमकुम या बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री होत्या. १९५४ साली ‘आर पार’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मिर्झा गालिब’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मात्र ‘नया दौर’, ‘मदर इंडिया’, ‘कोहिनूर’, ‘सन ऑफ इंडिया’, ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ५०-६०चं दशक त्यांनी आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गाजवलं होतं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 4:00 pm

Web Title: veteran bollywood actor kumkum passes away at 86 mppg 94
Next Stories
1 ICU मध्ये असणाऱ्या अनुपम श्याम यांच्यासाठी चाहत्यांनी केली आर्थिक मदतीची मागणी
2 आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं ‘माँ पहेली’ प्रदर्शित
3 प्राजक्ता माळी म्हणतेय, मी लॉकडाउन फळलेली कलाकार, जाणून घ्या कारण…
Just Now!
X