26 November 2020

News Flash

VIDEO : निधनाच्या अफवांविषयी खुद्द मुमताज काय म्हणतायेत पाहिलं का?

'नमस्कार... मी मुमताज बोलतेय...', असं म्हणणाऱ्या मुमताज यांच्या आवाजातूनच चाहत्यांप्रती असणारं प्रेम व्यक्त झालं.

मुमताज

शम्मी कपूर यांच्यासोबत ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’… या गाण्यावर थिरकणारी ती अभिनेत्री आठवतेय का…? अगदी बरोबर. त्या अभिनेत्रीचं नाव आहे मुमताज. गेले काही दिवस सोशल मीडियावर मुमताज यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये त्यांच्या निधनाच्या अफवेने जोर धरला होता. अचानकच व्हायरल झालेला एक मेसेज असा काही पसरला की, सिनेरसिकांनी परदेशात असणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. नेमकं काय घडत आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता, कारण याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर खुद्द मुमताज यांच्याच मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत मुमताज यांची प्रकृती ठीक असल्याचं सर्वांना सांगितलं.

मुलगी तान्या माधवानी आणि जावई मार्को सिलिया यांच्यासोबत मुमताज सध्या इटलीतील रोम येथे असून त्यांच्या प्रकृतीत कोणच्याही प्रकारचा बिघाड झाला नसल्याचं हा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. ‘आईची प्रकृती बिघडल्याच्या बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पण, मी तिच्या चाहत्यांना सांगू इच्छिते की, तिची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ती सध्या माझ्यासोबत रोममध्ये आहे. ती फक्त एक अफवाच होती’, असं तान्या या व्हिडिओमध्ये म्हणाली. ज्यानंतर तिने आपल्या आईसोबतचे काही फोटोही पोस्ट केले.

तान्याने यानंतर मुमताज यांचाही एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. ‘नमस्कार… मी मुमताज बोलतेय…’, असं म्हणणाऱ्या मुमताज यांच्या आवाजातूनच चाहत्यांप्रती असणारं प्रेम व्यक्त होत होतं. चाहत्यांच्या मनात असणारं आपलं स्थान आजही कायम आहे ज्याबद्दल मी त्यांची नेहमीच ऋणी असेन, असं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवा शमल्या असून चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:53 pm

Web Title: veteran bollywood actress mumtaz daughter shares pics and video of the her mother says shes happy and healthy
Next Stories
1 सोनमच्या लग्नाविषयी ‘डॅडी कूल’ अनिल कपूर म्हणतायेत…
2 …म्हणून नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून बिग बींचा काढता पाय?
3 ‘त्या’ अभिनेत्रीच्या शोधात दादासाहेबांनी जिवाचं रान केलेलं, पण…
Just Now!
X