News Flash

तीन वर्षांतील मोदींच्या कामगिरीचे लतादिदींकडून कौतुक!

नरेंद्र भाई...गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही भारताला प्रगतीपथावर नेलं आहे

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रीय आहेत याचे दाखले आपल्याला अनेकदा मिळाले आहेत. नुकतंच त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशंसनार्थ एक ट्विट केलं आहे. मोदी सरकारने देशाचा कारभार हाती घेऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीदींनी हे ट्विट केलं आहे.

‘आदरणीय नरेंद्र भाई… गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही भारताला ज्याप्रमाणे प्रगतीपथावर नेलं आहे ही खरंच खूप प्रशंसनीय बाब आहे.’ असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यासोबतच दिदींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘मी देवाकडे प्रार्थना करते की तुमच्या या सर्व महान कामांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि आपल्या देशाला सुवर्णयुग पाहण्याची संधी मिळो.’ असंही दिदी ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

वाचा: ‘नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील ६१% जनतेला ‘अच्छे दिन”

लतादिदींच्या या ट्विटवर अनेकांनीच प्रतिक्रिया दिल्या असून त्यांची मतं मांडली आहेत. काहीजणांनी दिदींना पाठिंबा देत मोदी सरकारची प्रशंसा केली आहे. तर काही जणांनी या ट्विटमुळे दिदींची खिल्ली उडवली जाऊ नये असंही म्हटलं आहे. एका नेटिझनने बेरोजगारीच्या मुद्द्याविषयी ट्विट करत पंतप्रधानांचं या विषयाकडे लक्ष वेधण्याची विनंतीही दिदींना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:02 pm

Web Title: veteran singer lata mangeshkar appreciates prime minister narendra modi from her tweet
Next Stories
1 Tubelight : ..’या’ आजारामुळे सलमानला मिळाली प्रेरणा
2 PHOTO अभिनेत्यांचा आलिशान आशियाना!
3 Cannes Film Festival 2017: ..असा असेल यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’
Just Now!
X