News Flash

‘विकी डोनरमधल्या किसिंग सीनमुळे पत्नी झाली होती नाराज’

विकी डोनर सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला, पण या सिनेमातल्या त्याप्रसंगामुळे संसारात तणाव निर्माण झाला असे आयुषमानने म्हटले आहे

अॅक्टर आणि सिंगर आयुषमान खुराना सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या दोन्ही सिनेमांना खूप चांगलं यश बॉक्स ऑफिसवर मिळालं आहे. मात्र पहिल्या सिनेमातल्या किसिंग सीनमुळे पत्नी नाराज झाली होती अशी कबुली आयुषमान खुराना याने दिली आहे. विकी डोनर हा आयुषमान खुरानाचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात यामी गौतम आणि आयुषमान यांचा किसिंग सीन आहे. या सीनमुळे माझी पत्नी ताहिरा माझ्यावर नाराज झाली होती. तिने माझी साथ सोडली होती, आमच्यात तीन वर्ष ताण तणाव निर्माण झाले होते असं आयुषमान खुरानाने म्हटलं आहे.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या फिल्टर नेहा या चॅट शोमध्ये आयुषमान खुरानाने त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले. याचवेळी त्त्याने विकी डोनर सिनेमाची अशीही आठवण सांगितली. विकी डोनर सिनेमा चांगला चालला. त्याला बॉक्स ऑफिसवर यशही मिळालं. मात्र या सिनेमातल्या किसिंग सीनमुळे पत्नी ताहिरा चांगलीच नाराज झाली होती. आमच्या संसारातली तीन वर्षे कशी गेली हे मलाच ठाऊक आहे असेही आयुषमानने म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच आयुषमानने पत्नी ताहिरासाठी करवा चौथचा उपवास केला होता. गेल्या काही दिवसांपासून आयुषमानची पत्नी ताहिरा आजारी आहे. त्यामुळे केवळ ताहिराच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी यावेळी आयुषमानने उपवास केला होता. आता त्याने त्याच्या वैवाहिक आयुष्यात किसिंग सीनमुळे वादळ आलं होतं असं सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:28 am

Web Title: vicky donor kiss caused trouble in my marriage for 3 yrs says ayushmann
Next Stories
1 ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चे तिकीट दर वाढणार?
2 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा
3 संजय दत्त करणार मराठी सिनेमाची निर्मिती
Just Now!
X