News Flash

‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो

श्याम कौशल यांनी इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. 'बाजीराव मस्तानी', 'गुंडे', 'दंगल' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं.

श्याम कौशल, विकी कौशल

‘मसान’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘राजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलचा आज ३२ वा वाढदिवस. सोशल मीडियावर जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विकीच्या वडिलांनी त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. श्याम कौशल यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोत श्याम कौशल यांनी विकीला कडेवर उचलून घेतलं आहे. ‘हॅपी बर्थडे पुत्तर. तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम. देव तुला नेहमी खुश ठेवो. आता मी तुझ्या नावाने ओखळला जातो, याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे’, असं त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. श्याम कौशल यांनी इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. ‘बाजीराव मस्तानी’, ‘गुंडे’, ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं.

आणखी वाचा : हृतिकसोबत असलेल्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे सर्वांत लोकप्रिय अभिनेता 

विकीच्या भावानेही त्याच्यासाठी सुंदर पोस्ट लिहिली आहे. विकीसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत सनी कौशलने लिहिलं, ‘काहीच बदललं नाही. फोटो पेपरवरून फोनवर आला, बाकी काहीच बदललं नाही. तू २ फूट ६ इंचांवरून ६ फूट २ इंचांचा झालास, बाकी काहीच बदललं नाही. आपण आधी कूल होतो, आता ‘वेरी कूल’ झालो, बाकी काहीच बदललं नाही. मी डावीकडे होतो, तू उजवीकडे होतास, बघ काहीच बदललं नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!’

विकी कौशल लवकरच ‘सरकार उधम सिंग’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. शूजित सरकार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:07 pm

Web Title: vicky kaushal dad shares his rare childhood pic on birthday proud to be known by your name ssv 92
Next Stories
1 रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर
3 गरजुंच्या मदतीसाठी ‘दबंग गर्ल’ आली पुढे; कलेच्या माध्यमातून करणार आर्थिक सहाय्य
Just Now!
X