19 January 2020

News Flash

मुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओतील विकीचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

विकी कौशल

दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विकी कौशलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. ‘रेअर फोटो क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून क्षणार्धात तो व्हायरल झाला आहे. विकीच्या अॅक्टींग स्कूलमधला हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओतील विकीचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. केसांना चपचपीत तेल, तोंड रंगवलेला विकी हैदराबादी लहेजात मुलीशी फ्लर्ट करताना दिसतोय. त्यातही त्याचं अभिनय कौशल्य विशेष लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील सेक्सी महिला; ‘या’ करतात बॉलिवूड अभिनेत्रींवर मात

विकी सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘मसान’, ‘उरी’, ‘संजू’, ‘राजी’ या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक करण्यात आलं.

First Published on December 15, 2019 12:50 pm

Web Title: vicky kaushal flirting with woman video viral ssv 92
Next Stories
1 अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन
2 ‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी
3 हरवली पाखरे.. ‘लहान मुलांच्याही ओठी सासू-सुनांचे संवाद..‘
Just Now!
X