13 August 2020

News Flash

बापरे! चित्रपटासाठी या अभिनेत्याने स्वत:ला पाच दिवस कोंडून घेतले!

चित्रपटातील माझी भूमिका ही मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे.

चित्रपटात विकी कौशल एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. पण ही पोलीस अधिकाऱयाची भूमिका वेगळ्या धाटणीची आहे.

‘मसान’ चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याने ‘रमण राघव २.०’ या त्याच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने स्वत:ला पाच दिवस कोंडून घेतले होते. खुद्द विकीने याबाबत खुलासा केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित रमण राघव २.० चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी एका सिरिअल किलरच्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपटात विकी कौशल एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. पण ही पोलीस अधिकाऱयाची भूमिका वेगळ्या धाटणीची आहे.

‘चित्रपटातील माझी भूमिका ही मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. अशी भूमिका मी कधीच साकारलेली नाही. भूमिकेतील पात्र हे त्रासलेले, ड्रग्जच्या आहारी गेलेले आणि खूपच गंभीर आहे. त्यामुळे हे पात्र जवळून समजून घेण्याची मला गरज होती’, असे कौशलने म्हणाला.

अनुराग कश्यप हा माझ्या जवळचा व्यक्ती असला तरी मी या चित्रपटातील भूमिकेसाठी रितसर ऑडीशन दिली होती आणि निवड होण्यासाठी खूप मेहनत घेतली. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी काही गोष्टी करणे मला महत्त्वाचे वाटले. त्यामुळे मी स्वत:ला जिथे वाय-फाय नाही, फोन नाही, उजेड नाही अशा अंधऱया खोलीत स्वत:ला पाच दिवस डांबून घेतले होते व पूर्ण लक्ष माझ्या ऑडीशनच्या त्या दोन सीनच्या तयारीवर केंद्रीत केले होते, असे कौशलने सांगितले.

दरम्यान, ‘रमन राघव २.०’ हा चित्रपट यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार असून, चित्रपटात गृहात २४ जून रोजी दाखल होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 12:36 pm

Web Title: vicky kaushal locked himself up to tap dark side for raman raghav 2 0
Next Stories
1 ‘करिश्मासोबत माझं ब्रेकअप झालेलं नाही’
2 नागराजच्या ‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाईकडे वाटचाल!
3 Sairat movie: ‘सैराट’ने आमीर खानलाही ‘याडं लावलं’
Just Now!
X