24 January 2021

News Flash

विकी कौशलनं उलगडली त्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

'एकमेकांना जाणून घेण्याचा प्रवास खूप अविस्मरणीय असतो. '

हरलीन सेठी, विकी कौशल

‘मसान’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. या चित्रपटाच्या यशासोबतच विकीचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं. टीव्ही अभिनेत्री हरलीन सेठी आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये झाली. इतकंच नव्हे तर ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये त्याने प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने खुल्लमखुल्ला हरलीनसाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

एका मित्राच्या माध्यमातून हरलीनशी भेट झाली असं विकी सांगतो. ‘अगदी पहिल्या भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. सुरुवातीपासूनच माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमाची भावना होती. त्यानंतर हळूहळू आमच्यात मैत्री वाढली. एकमेकांना जाणून घेण्याचा प्रवास खूप अविस्मरणीय असतो. कोणतेही फार कष्ट न घेता ही मैत्री फुलत गेली,’ असं त्याने सांगितलं. आम्हाला दोघांना एकमेकांचा सहवास खूप आवडत असून एकमेकांच्या न पटणाऱ्या गोष्टीही आम्ही मोकळेपणाने सांगतो, असंही तो म्हणाला.

कोण आहे हरलीन सेठी?
डान्सर म्हणून हरलीनने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही काळ तिने ‘एनडीटीव्ही गुड टाइम्स’ या वाहिनीसोबत काम केलं. २०१३ मध्ये तिला अभिनेत्री म्हणून पहिली संधी मिळाली. ‘पिअर्स’ आणि ‘ब्लू स्टार’ यांसारख्या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 2:54 pm

Web Title: vicky kaushal reveals how he fell in love with girlfriend harleen sethi
Next Stories
1 ‘दबंग ३’च्या माध्यमातून अरबाजच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 #GlimpsesOfKesari : अविश्वसनीय शौर्यगाथेची पहिली झलक पाहिलीत का?
3 लग्नाच्या प्रश्नावर कतरिनाचं अजब उत्तर
Just Now!
X