News Flash

विकी कौशलच नवीन टॅलेंट पाहून तुम्ही व्हाल शॉक

विकी कौशलचे 'हे' नवीन टॅलेंट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Photo-Indian express

विकी कौशल हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘उरी’ मधली त्याच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली होती. विकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटासाठी असो किंवा त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधीत असो तो सतत चर्चेत असतो. मात्र आता विकी वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. विकी हा एक अष्टपैलू अभिनेता आहे. मात्र अभिनयसोडून अजून एका टॅलेंटसाठी विकी कौशल सध्या चर्चेत आहे.

विकी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो सतत पोस्ट करून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतो. सध्या विकीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्ट मध्ये विकीचे नवीन टॅलेंट लोकांच्या समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

नुकतीच विकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विकी त्याच्या क्यूट स्माईलने घायाळ करतो आहेच पण त्याच बरोबर त्याच्या हातात एक लक्ष वेधून घेणारे पेंटिंग देखील आहे. हे पेंटिंग गणपतीचे आहे. विकीच्या पोस्टवरून हाच अंदाज लावला जात आहे की हे पेंटिंग त्यानेच काढले असावे. विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसून येत आहे. तसेच या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

दरम्यान विकी कौशल त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. तो आणि अभिनेत्री कतरिना कैफ रिलेशनशीप मध्ये असल्याचे समोर आले. तसेच विकी करण जोहरचा आगामी चित्रपट ‘तख्त’ मध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 2:59 pm

Web Title: vicky kaushal shows of hidden talent post went viral on instagram aad 97
Next Stories
1 दिया मिर्झाने सावत्र मुलीसोबत केला डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल
2 लग्नाच्या एक महिन्यातच अभिनेत्याच्या नात्यात पडली फूट? पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
3 ‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल
Just Now!
X