अभिनेता विकी कौशलला अभिनेत्री कतरिना कैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी पाहिलं गेलं. विकीने कतरिनाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विकी आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. पण या दोघांनीही अद्याप जाहीर कबुल दिली नाही. आता विकीने कतरिनाच्या घरी जाऊन तिची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
२८ सप्टेंबर रोजी विकीचा भाऊ सनीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त कतरिनाने सोशल मीडियावर सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याआधी ऑगस्ट महिन्यातसुद्धा विकीला कतरिनाच्या घराबाहेर पाहिलं गेलं.
आणखी वाचा : ‘बबड्या’ हे नाव कसं सुचलं? तेजश्रीने सांगितली खरी गंमत
‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. विकीच्या चित्रपटातील दमदार अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सर्वत्र असते. गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकी कतरिना कैफला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. कतरिनामुळे हरलीन आणि विकी यांचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं जातं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 10:08 am