News Flash

Video : सलमान-शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स केला म्हणून अभिनेत्याला पोलिसांनी पकडले

त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

विकी कौशलचा भाऊ सनी कौशल लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. तो ‘भांगड़ा पा ले’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुखसार डिल्लन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सनी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. मात्र सनीने त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे. इतकेच नव्हे तर प्रमोशन दरम्यान त्याला आणि रुखसारला पोलिसांनी अटक केली आहे.

सनी आणि रुखसान त्यांचा आगामी चित्रपट ‘भांगड़ा पा ले’चे प्रमोशन करण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमानच्या घराबाहेर पोहोचले. त्यांनी तेथे चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. त्यांचा डान्स पाहून तेथे चाहत्यांची गर्दी जमली. काही वेळातच ही गर्दी हटवण्यासाठी पोलिस तेथे पोहोचतात. हे पोलिस सनी आणि रुखसारला पकडून घेऊन जातात.

सनी आणि रुखसारने त्यांच्या आगमी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखच्या ‘मन्नत’ आणि सलमानच्या ‘गॅलेक्सी’ घराबाहेर डान्स करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा डान्स चाहत्यांच्या पसंतीला उतरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान त्यांनी फ्लॅश मॉब देखील सादर केला. ‘भांगड़ा पा ले’ हा चित्रपट ३ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 11:24 am

Web Title: vicky kaushals brother sunny arrested for dancing outside salman and shah rukh khans residence avb 95
Next Stories
1 मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक
2 वाहिन्यांत भीम दिसतो गा..
3 ‘वडिलांबरोबर काम करायला आवडेल’
Just Now!
X