28 September 2020

News Flash

‘उरी’ने ओलांडला २०० कोटींचा टप्पा, उपराष्ट्रपतींनाही आवडला सिनेमा; ट्विट करुन म्हणाले…

उपराष्ट्रपती भवानाची सुरक्षा करणाऱ्या इंडो-तिबेटीन बॉर्डर पोलिसांसोबत नायडूंने हा सिनेमा पाहिला

उपराष्ट्रपतींनाही आवडला सिनेमा

विकी कौशलचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. हा सिनेमा २०१९ मधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. सिनेमाने जगभरामध्ये २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सिनेमाच्या यशानंतर सिनेमाशीसंदर्भात सर्वांचा ‘जोश’ एकदम ‘हाय’ आहेत. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी या सिनेमाचा खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. इंडो-तिबेटीन बॉर्डर पोलिसांच्या जवानांसोबत नायडू यांनी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा उपराष्ट्रपतींनाही आवडल्यांचे त्यांनी स्वत: ट्विट करुन सांगितले आहे.

उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हॅण्डलवरुन या स्क्रीनिंगसंदर्भातील फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये उपराष्ट्रपती म्हणतात, ‘आज उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा पाहिला. नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती भवानाची सुरक्षा करणाऱ्या इंडो-तिबेटीन बॉर्डर पोलिसांच्या जवानांसोबत हा सिनेमा पाहिला. हा प्रेरणादायी सिनेमा आहे. भारतीय लष्कराचे शौर्य मोठ्या पडद्यावर साकारणाऱ्या उरी सिनेमाच्या टिममधील सर्व कलाकार आणि सदस्यांचे अभिनंदन.’

दरम्यान उरी सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत जगभरातील एकूण कमाईचा आकड्याने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाने २९ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ३४ कोटींची कमाई केली आहे. तर देशामध्ये या सिनेमाच्या कामाईने १६५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाची आत्तापर्यंत एकूण कमाई ही २२५ कोटींहून अधिक आहे. चौथ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत सिनेमा २५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 12:50 pm

Web Title: vicky kaushals uri enters rs 200 crore club worldwide gets a thumbs up from vice president
Next Stories
1 अभिनेत्री शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात
2 श्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण
3 आला रे आला रोहित आला… ‘सिम्बा’च्या कमाईतील ५१ लाख दिले मुंबई पोलिसांना
Just Now!
X