अजय देवगणचा लोकप्रिय ठरलेल्या ‘दृश्यम’ या सिनेमाच्या मल्याळी सिक्वलनंतर आता हिंदी सिक्वल येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. ‘दृश्यम-2’ हा सिनेमा येणार अशी चर्चा सुरू असतानाच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘दृश्यम’ च्या हिंदी रिमेकला प्रोड्यूस करणारी कंपनी वायकॉम 18 मोशन पिक्चरने निर्माते कुमार मंगत यांच्याविरोधत खटला दाखल केलाय.

निर्मात्यावर कंपनीनीचे आरोप

कंपनीच्या म्हणण्यानुसार ‘दृश्यम सिनेमाची निर्मिती वायकॉम 18, पॅनोरमा स्टूडियो आणि कुमार मंगत यांनी केली होती. त्यामुळे . ‘दृश्यम-2’ सिनेमाचे हक्क निर्मात्याने फक्त पॅनोरम स्टूडिओला कसे दिले?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसचं एका वृत्तानुसार वायकॉम 18 कंपनीने निर्माते  कुमार मंगत यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सिनेमाचे अधिकार फक्त कुमार मंगत यांच्याकडे नाहित. वायकॉम 18 ने कुमार मंगत यांना ते इतर कुणासोबत सिनेमा बवनू शकत नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कुमार मंगत यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला असून लवकरच त्यावर सुनावणी सुरू होईल.

2015 सालात मल्याळी सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘दृश्यम’ सिनेमाची निर्मिती कुमार मंगत, अभिषेक पाठक यांची प्रोडक्शन कंपनी पॅनोरम स्टुडिओ इंटरनॅशनल आणि वायकॉम 18 ने एकत्रीत केली होती. मात्र नुकतच निर्माते कुमार मंगत यांनी पॅनोरमा स्टुडिओने ‘दृश्यन-2’ सिनेमाचे राईटस् विकत घेतल्याची घोषणा केली. यानंतर हा वाद निर्माण झाला आणि वायकॉम 18 कंपनीने खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

आधीच्या चित्रपटाप्रमाणेच यंदाही मल्याळी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत ‘दृश्यम २’ सुपरहीट ठरला. हाच सस्पेन्स आणि थ्रीलर घेऊन हिंदीमधल्या सिक्वेलमध्ये अभिनेता अजय देवगण कधी भेटीला येणार, अशी चर्चा सगळीकडेच सुरू होती. परंतू या चर्चांवर पूर्णविराम लागला असून तब्बू आणि अजय हेच पुन्हा एकदा सिक्वेलमध्ये दिसणार असून दोघांनीही या ‘दृश्यम २’ साठी होकार दिला आहे. 2021 च्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग सुरुवात होणार असून 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आलीय.