News Flash

VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर अब्राम डान्स करतो तेव्हा..

'धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल'चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा

शाहरुख - गौरी खानचा मुलगा अब्राम

‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अनेक कलाकारांची मुलं याच शाळेत शिकतात. या मुलांमध्ये ऐश्वर्या – अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, आमिर खान – किरण रावचा मुलगा आझाद आणि शाहरुख – गौरी खानचा मुलगा अब्राम यांचाही समावेश आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाहरुख खान, हृतिक रोशन, लारा दत्ता, सोनू निगम, रविना टंडन, ऐश्वर्या राय बच्चन हे सेलिब्रिटी पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.

वाचा : विरुष्काने पाहुण्यांना दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

आपल्या कामातून वेळ काढून शाहरुखने कार्यक्रमाला खास हजेरी लावली होती. त्याच्यासोबत पत्नी गौरी आणि मुलगी सुहानादेखील होत्या. मात्र, यावेळी शाहरुख, ऐश्वर्यासारखे मोठे कलाकार उपस्थित असूनही सर्वांच्या नजरा त्यांच्या मुलांवरच खिळल्या होत्या. वार्षिक स्नेहसंमेलनात अब्राम, आझाद आणि आराध्याने डान्स सादर केला. अब्रामने तर त्याच्याच वडिलांच्या गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखच्या ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये तारा वो तारा हर तारा’ या सुंदर गाण्यावर चिमुकल्यांनी ठेका धरला. हा व्हिडिओ पाहता आपल्या वडिलांचे कलागुण आता अब्राममध्येही दिसून येत आहेत.

वाचा : क्यूट ‘पिकाचू’चा डिटेक्टिव्ह अवतार

आराध्यानेही केलेला परफॉर्मन्स सध्या अनेकांचीच मनं जिंकत असून, तिनेसुद्धा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच कलेची वाट धरल्याचे पाहायला मिळते. व्यासपीठावर गाणे सुरु होताच, ठेका न चुकवता अगदी शिकवल्याप्रमाणेच आराध्या मोठ्या आत्मविश्वासाने नाचत होती. यावेळी, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मधील गाण्यावर ठेका धरत ऐश्वर्या आपल्या लेकीचा व्हिडिओ काढण्यात मग्न होती. या खास दिवशी आपल्या मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि वृंदा राय यांनी हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 10:31 am

Web Title: video abram aaradhya bachchan azad rao khan left their star parents proud on stage
Next Stories
1 विरुष्काने पाहुण्यांना दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट
2 TOP 10 NEWS : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी, गॉसिप फक्त एका क्लिकवर
3 ऑरेंज सिटी आंतरराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ फेब्रुवारीपासून
Just Now!
X