News Flash

काय??ब्रिटीश एअरवेजमधून अनन्या पांडेने चोरला नाईट सूट

अनन्या पांडेने सांगितला भन्नाट किस्सा

फॅशनसेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अभिनेता चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्या ‘स्टुडंड ऑफ द इअर 2’ च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता -पाहता लोकप्रिय झाली. अलिकडेच अनन्याने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट सीझन 3’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अनन्याने तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. विशेष म्हणजे तिने एकेकाळी ब्रिटीश एअरवेजमधून चक्क नाईट सूट चोरल्याचंदेखील सांगितलं.

‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या शोमध्ये करीनाने अनन्याला तिच्या लूकविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलत असताना अनन्याने अनेक गुपित उघड केली. यामध्येच तिने ब्रिटीश एअरवेजमधून नाइट सूट चोरल्याचंदेखील सांगितलं.

“मी ब्रिटीश एअरवेजमधून नाइट सूट चोरला आणि तोच दररोज परिधान करते. मला तो खूप आवडतो. तसंच मी कधी कधी माझ्या वडिलांचे लूज टी शर्टदेखील घालते”, असं तिने सांगितलं.

पाहा : प्रियांका-निकचं इथेच झालं शुभमंगल! पाहा आतून कसा दिसतो उमेद भवन पॅलेस

 पुढे ती म्हणते, “मला फॅशन, अभिनयाची खूप आवड आहे, पण मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. मला स्वयंपाक करतासुद्धा येत नाही, त्यामुळे मी कधी किचनमध्ये पाय ठेवत नाही”.

दरम्यान, अनन्या पांडे स्टारकिड असण्यासोतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. आतापर्यंत अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’, ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:18 pm

Web Title: video ananya pandey had stolen british airways nightsuit she revealed ssj 93
Next Stories
1 कुटुंबाचा विरोध पत्करुन शर्मननं केला ‘हेट स्टोरी’; अन् त्यानंतर घडलं असं काही…
2 नीतू कपूर, वरुण धवन करोना पॉझिटिव्ह? ‘जुग जुग जियो’चं चित्रीकरण अर्ध्यावर
3 “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक
Just Now!
X