News Flash

कंगना रणौतचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल

तुम्ही पाहिलाय का तिचा व्हिडीओ...

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर तिने मांडलेली रोखठोक मतं नेटिझन्सच्या पसंतीस पडली. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला. पण, कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेलं आक्षेपार्ह ट्विट तिच्यासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. या आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर काही युजर्स कंगनाला ट्रोल करताना दिसत आहेत. अशाच एका युजरने कंगनाचा एक जुना व्हिडीओ थोडासा एडिट करून पोस्ट केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

कंगना रणौत आणि शाहिद कपूर या दोघांनी ‘रंगून’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगनाने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कंगना सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव्ह नव्हती. याचसंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आला होता. कॉमेडियन कपिल शर्माने कंगनाला विचारले होते, “तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाही?” त्यावर कंगना म्हणाली होती, “मला असं वाटतं की ज्या लोकांना फारसं काम नसतं. जे लोक रिकामटेकडे असतात तेच लोक सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट टाकत असतात. ज्यांना काहीच काम नसतं त्यांना ‘काय करायचं’ हा प्रश्न पडतो म्हणून ते लोक सोशल मीडियावर टाईमपास करत असतात”, असं उत्तर तिने दिलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudhanshu (@_memeland_69___)

या व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून तिला याच वक्तव्यावरून ट्रोल केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 5:01 pm

Web Title: video kangana ranaut bold beautiful old video viral on social media views on twitter facebook watch vjb 91
Next Stories
1 नेहमी मला ट्रोल केले जाते; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
2 नजर वेधून घेणारी नोज रिंग, कपाळी कुंकू… मिलिंद सोमणचा हटके लूक
3 नेहा कक्करने शेअर केला ‘First Kiss’चा व्हिडीओ, पाहून पती म्हणाला…
Just Now!
X