News Flash

Video: समलैंगिक मित्राच्या लग्नात ‘अफगाण जलेबी’वर थिरकली कतरीना

या दोघांनी हिंदू पद्धतीने गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न केलं

'अफगाण जिलेबी'वर थिरकली कतरीना

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे एखाद्या बड्या कार्यक्रमामध्ये परफॉर्मन्ससाठी लाखो रुपयांच्या सुपाऱ्या घेतात हे आता जगजाहीर आहे. मात्र जवळच्या एखाद्या व्यक्तीचे लग्न असेल तर हे कलाकारही अगदी दिल खोल कर डान्स करताना दिसतात. अभिनेत्री कतरीना कैफचा सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका खास लग्नामध्ये कतरीना बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे.

कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या डॅनियल सी बाऊरने नुकतेच गोव्यामध्ये थाटामाटात लग्न केले. या लग्नसमारंभातील कतरीनाच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे मूळचा ऑस्ट्रेलियन असणाऱ्या डॅनियलने त्याचा समलैंगिक जोडीदार असणाऱ्या टायरोन ब्रगनजा यांच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. या दोघांनाही अगदी हळद, मेहंदी आणि संगीत यासारखे कार्यक्रमही केले. या दोघांनी मागील वर्षी जर्मनीमध्ये ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. त्यानंतर आता त्यांनी नवीन हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे. ते दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

कतरीनानेही या लग्नातील काही फोटो आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. पणजीमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्यामध्ये कतरीना अगदी घरचं लग्न असल्यासारखी सहभागी झाली. निळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये कतरीनाने ‘जीलेबी बाई’ गाण्यावर डान्सही केला. तिच्या याच डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

कतरीना सध्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारबरोबर काम करत असून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षानंतर एकाच चित्रपटामध्ये झळकणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:03 pm

Web Title: video katrina kaif dances to afghan jalebi at makeup artist daniel bauers wedding in goa scsg 91
Next Stories
1 रितेश करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची निर्मिती, अजय देवगणचा खुलासा
2 Happy Birthday AR Rahman: ऑस्कर पटकावणारा भारतातील एकमेव संगीतकार
3 Video : संकर्षण कऱ्हाडे EXCLUSIVE मुलाखत
Just Now!
X