News Flash

Video: ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर भारती सिंग आणि नोरा फतेहीमध्ये झाले भांडण

पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या उत्तम डान्ससाठी ओळखली जाते. नोराने ‘डान्स दीवाने’ या डान्स रिअॅलिटी शो मध्ये पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. या वेळी राघवच्या जागी सुत्रसंचालन करण्यासाठी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया आले होते. त्याचवेळी भारती आणि नोरामध्ये स्टेजवर भांडण झालं. एवढंच नाही तर त्या स्टेजवर एकामेकांच्या अंगावर बसून भांडत होत्या. त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ कलर्सटीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला नोरा स्पर्धक पीयूष गुर्भेले सोबत डान्स करताना दिसत आहे. तिला पाहून भारतीस्टेरवर येते आणि पीयूषला खेचत डान्स करण्याचा प्रयत्न करते. तर लगेच नोरा पीयूषसोबत डान्स करण्याचा प्रयत्न करते. याच दरम्यान, भारती आणि नोरामध्ये भांडण होतं. या दोघीही पीयूषला खेचता खेचता स्टेवर पडून जातात. तेव्हाच त्यांच्यातील भांडणही थांबतं.

दरम्यान, शोचा सुत्रसंचालक राघव जुयालला करोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर या आधी परिक्षक धर्मेश येलांडेला आणि सेटवरील १८ लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 5:00 pm

Web Title: video of bharti singh and nora fatehi fight on the set of dance deewane went viral dcp 98
Next Stories
1 मालिकांचे चित्रीकरण सुरु…; महाराष्ट्राच्या महावाहिनीने घेतला अविरत मनोरंजनाचा वसा
2 “आपल्याच सहकार्यांची उपासमार करतोय..”, मालिकांच्या निर्मात्यांना अमेय खोपकर यांनी सुनावलं
3 चार दिवसांत अर्जुन झाला करोनातून बरा….कसा? त्यानेच सांगितलं कारण!
Just Now!
X