News Flash

VIDEO: नीतू सिंग यांच्या ‘फिटनेस’चे रहस्य

नीतू यांचा हा व्हिडिओ भारावून टाकणारा आहे.

नीतू सिंग

बॉलीवूडमध्ये ७०-८० चे दशक आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवणा-या अभिनेत्री म्हणजे नीतू सिंग. रिधीमा कपूर (वय ३६) आणि रणबीर कपूर (वय ३४) या दोन मुलांच्या त्या आई आहेत. पण, ५८ वर्षीय नीतू सिंग यांचा उत्साह जणू काही २५ वर्षाच्या मुलीप्रमाणेच असल्याचे सध्या दिसतेय. नीतू यांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे ठरवले असून त्या सध्या वजन कमी करण्यासाठी व्यायामाकडे वळल्या आहेत. असे आम्ही म्हणत नाही आहोत, तर नीतू यांनी शेअर केलेला व्हिडिओच हे दाखवून देत आहे.

नीतू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जीममधील वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या टीआरएक्सवर व्यायाम करताना दिसतात. आपली सर्व शक्ती त्या व्यायामासाठी लावत असल्याचे या व्हिडिओत पाहावयास मिळते. ट्रेनरचे ५०पर्यंत आकडे पूर्ण होईपर्यंत त्या काटेकोरपणे आणि न थांबता व्यायाम करत असल्याचे यात दिसते. सदर व्हिडिओ शेअर करत नीतू यांनी त्याला एक कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहलेय की, आव्हानांचा सामना करणं हेच खरं आयुष्य असतं. माझा काउन्ट ५० आहे आणि तुमचा…. चला जगाला आणखी आरोग्यदायी बनूया. या कॅप्शनला त्यांनी आव्हान (#dare), टीआरएक्स नीतू चॅलेंज (#trxkneetuckchallange) हे हॅशटॅग्स दिले आहेत. नीतू यांचा हा व्हिडिओ खरंच प्रेरणादायी असून जीममध्ये जाण्यासाठी तुमच्यात नक्कीच उत्साह निर्माण करेल.

१९६६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दस लाख’ या चित्रपटामध्ये नीतू यांनी बाल-कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी आजवर ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूरसोबत त्यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती. नंतर रुपेरी पडद्यावरील या जोडीने ख-या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. नीतू आणि ऋषी यांनी १९८० साली विवाह केला. त्यानंतर १९८३ सालापासून त्यांनी अभिनयाला अर्धविराम दिला. २००७ सालापासून त्या पुन्हा लहान-मोठ्या भूमिकांमधून चित्रपटांत चमकल्या. २०१३ साली आलेल्या ‘बेशरम’ या चित्रपटात त्या शेवटच्या रुपेरी पडद्यावर दिसल्या. या चित्रपटात ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केले होते.

fitness-secrets-of-neetu-singh-743x1024

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 11:04 am

Web Title: video of neetu singh doing trx training will give you fitness goals
Next Stories
1 ‘खून भरी मांग’ फेम अभिनेत्री सोनू वालिया यांना अश्लील फोन कॉल; पोलिसांकडे तक्रार दाखल
2 ‘दक्षिणायन’तर्फे अजेय चित्रपट मालिका
3 चित्ररंग : हाणामारीचा ‘विद्युत’घट!
Just Now!
X