News Flash

डॉक्टर डॉनच्या सेटवर ‘पावरी चल रही है’

व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.

डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची धमाल हि चालूच असते. ऑनस्क्रीन हे कलाकार जेवढा कल्ला करतात तितकंच ऑफस्क्रीन देखील त्यांची मस्ती चालू असते. सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या ‘पावरी चल रही है’ या ट्रेंडला अनुसरून देवदत्त नागे याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सेटवरच्या आवारात असलेल्या बोराच्या झाडावरून डॉक्टर डॉनची टीम बोरं काढतेय. त्यावेळी देवदत्तने व्हिडीओ शूट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devdatta G Nage (@devdatta.g.nage)

देवदत्त नागेने “ये हम है, ये हमारी शूटिंग कि पोरं है, और ये हमारी बोरं कि पावरी चल रही है” असं म्हणत देवदत्तने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नुसतं मालिकेतूनच नाही तर हे कलाकार प्रत्येक माध्यमातून प्रेक्षक आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असतात असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांमध्ये हसू अनावर झाले आहे. या धमाल व्हिडिओवर प्रेक्षक-चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 7:40 pm

Web Title: video on doctor don set pawari video avb 95
Next Stories
1 सर्जरीनंतर अमिताभ यांनी शेअर केला पहिला फोटो
2 करिश्मा का करिश्मा.. फिटनेस पाहून व्हाल थक्क!
3 काय? सनीला करायचं पुन्हा लग्न, सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त केली इच्छा
Just Now!
X