24 April 2019

News Flash

VIDEO : ‘रमा माधव’ फेम पर्ण- आलोकचा विवाहसोहळा पाहिलात?

पुण्यातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात कोणताही विधी करण्यात आला नव्हता.

पर्ण पेठे, आलोक राजवाडे

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. कारण कोण, कधी, कुठे आणि कसे भेटेल आणि कायमची जन्मगाठ बांधली जाईल, याचा काहीच नेम नसतो. अशीच भेट घडली होती ‘रमा माधव’ फेम अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांची. गेल्याच वर्षी या दोघांनी २९ फेब्रुवारीचा मुहूर्त साधून एकमेकांशी लग्नगाठ बांधली. ‘नाटकघर’ने ‘नाटक कंपनी’शी केलेल्या या लग्नाला दीड वर्ष उलटलं असून, त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा : ते तर माझ्यापेक्षाही उत्तम अभिनेते; प्रकाश राज यांची मोदींवर टीका

पर्ण- आलोकच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे कोणताही गाजावाजा न करता त्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ करण्यास प्राधान्य दिले. पुण्यातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात कोणताही विधी करण्यात आला नव्हता. मात्र, यावेळी दोघांनी एकमेकांची आयुष्यभरासाठी साथ देण्याचे वचन मात्र आवर्जून घेतले. लग्नाच्या दिवशी पर्ण लाल रंगाची साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने अशा पारंपरिक लूकमध्ये दिसली, तर आलोक सदरा लेंगा आणि त्यावर नेहरू जॅकेट अशा साध्याच लूकमध्ये दिसला.

लग्न ठरल्याचा आनंद प्रत्येक मुलीला असतोच, पण त्याच वेळी सगळ्या भावनांनी एकत्र एकाच वेळी तिच्या मनात गर्दीही केलेली असते. लग्नमंडपात उभ्या राहिलेल्या मुलीच्या मनात डोकावल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट दिसतात. अशीच काहीशी अवस्था पर्णचीही झालेली होती. तिच्या चेहऱ्यावरील भावच सर्वकाही व्यक्त करत होते.

वाचा : भूमिकेसाठी या ‘मिस इंडिया’ने केले होते टक्कल

दरम्यान, ‘नाटक कंपनी’तील कलाकार आणि या दोघांच्या मित्रमंडळींनी लग्नाला हजेरी लावल्याचे दिसते. तसेच पर्ण-आलोकच्या प्रेमाबद्दलही त्यांनी आपले विचार मांडत काही आठवणींना उजाळा दिला. रंगमंचावरुन सुरु झालेली ही प्रेमकहाणी सहजीवनाच्या तालमीमुळे दिवसेंदिवस आणखीन परिपक्व होईल, अशीच आशा त्यांच्या चाहत्यांच्याही मनात आहे.

First Published on October 3, 2017 1:05 am

Web Title: video rama madhav fame parna pethe and alok rajwade marriage