22 July 2019

News Flash

Video : अर्शद वारसीचं ‘आंख मारे ओ लडकी …’ सिम्बातून नव्या रुपात

'सिम्बा'मधील हे पहिलंवहिलं गाणं आहे.

सिम्बा,आंख मारे

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण ही स्टारमंडळी झळकणार असून मराठमोळा अभिनेता सिद्धर्थ जाधवचीदेखील यात वर्णी लागली आहे. अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आता ही उत्सुकता वाढविणारं असंच एक गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

रणवीस सिंग आणि सारा अली खान स्टारर चित्रपटातलं ‘आंख मारे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अभिनेता अर्शद वारसीचं लोकप्रिय गाणं ‘आंख मारे ओ लडकी आंख मारे…’या गाण्याचं हे रिमिक्स व्हर्जन आहे. रिमिक्स करण्यात आलेल्या या गाण्याला मिका सिंग आणि नेहा कक्कड यांच्या स्वरांचा साज चढला आहे. तर मुळ गाण्याला कुमार सानू यांचा आवाज लाभला आहे.

नव्या अंदाजात चित्रित झालेल्या या गाण्यामध्ये काही नव्या तर काही जुन्या डान्स स्टेप्सचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला कमी कालावधीमध्ये हजारो व्ह्युज मिळाले आहेत.

दरम्यान, ‘केदरानाथ’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे ‘आंख मारे’ हे तिला मिळालेले तिच्या करिअरमधील पहिले ब्लॉकबस्टर गाणे असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत तयार होणारा हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First Published on December 6, 2018 1:40 pm

Web Title: video ranveer singh and sara ali khan simmba first song out