19 February 2019

News Flash

Video: जेव्हा कतरिना- सलमान एका कपात कॉफी घेतात

सर्वांसमोर असे वागणे पाहून खरंच हे दोघं प्रेमात आहेत का असा प्रश्न पडतो

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा झाली. ‘टायगर जिंदा है’ सिनेमादरम्यान ही दोघं परत एकदा रिलेशनशिपमध्ये आहेत का असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. पण या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच खुलासा केला नाही. सलमान माझा जवळचा मित्र आहे हेच उत्तर कतरिना देताना दिसली तर कतरिना ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे हे सांगताना सलमान अजूनपर्यंत थकला नाही. पण सध्या ही दोघं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत ते त्यांच्या आगामी सिनेमासाठी नाही तर एकत्र कॉफी प्यायल्याने.

आता तुम्ही म्हणाल की, त्या दोघांनी एकत्र कॉफी प्यायली यात काय नवलं. पण चर्चा त्यांच्या कॉफी पिण्याची नसून एकाच कपातून त्यांनी कॉफी प्यायली याची आहे. ‘द-बंग’ टूरला सुरुवात होण्यापूर्वी सलमान खान, कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सोनाक्षी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत होती तर सलमान आणि कतरिना तिच्या बाजूला बसून त्यांचे बोलणे ऐकत होते. सलमान त्याच्या कपमधून कॉफीचे घोट घेत होता. इतक्यात कतरिना त्याच्या कानात काही तरी कुजबूजली आणि सलमानने त्याचा कॉफीचा कप तिला दिला. हे असे एकदा नाही तर अनेकदा त्यांनी केले.

ते दोघं एकाच कपमध्ये चहा पितानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचे सर्वांसमोर असे वागणे पाहून खरंच हे दोघं प्रेमात आहेत का असा प्रश्न त्यांचे चाहते विचारू लागले आहेत. सलमानच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘रेस- ३’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकतेच या सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखेचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. तर कतरिनाही ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

First Published on March 26, 2018 6:11 pm

Web Title: video salman khan and katrina kaif share cup of coffee