News Flash

VIDEO : .. अन् १५ वर्षांच्या मुलाच्या फेरारीवर खिळली सलमानची नजर

केवळ १५ वर्षे वय असलेला हा मुलगा फेरारीचा मालक आहे.

सलमान खान

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान सध्या संयुक्त अरब अमिराती येथे आगामी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचे चित्रीकरण करतोय. त्याच्यासोबत कतरिना कैफही तेथे गेली आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. आपल्या कामातून वेळ काढून सलमानने यावेळी अमिरातीमधील रेस कोर्सला भेट दिली. यावेळी त्याची नजर रशीद बेल्हासाने कस्टमाइज केलेल्या फेरारीवर पडली. रशीद बेल्हासा हा इन्स्टाग्रामवर मनी किक्स या नावाने प्रसिद्ध असून, त्यानेच सलमान त्याची फेरारी निरखून पाहत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय.

वाचा : हातात एकही चित्रपट नसताना करिष्मा कमवते कोट्यवधी रुपये!

मनी किक्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमानचा आगामी चित्रपटातील लूकही पाहावयास मिळतो. फेरारी पाहत असताना सलमान काहीतरी बोलत असल्याचेही दिसते. पण मनी किक्सने व्हिडिओला वेगळे म्युझिक दिल्याने सलमान नक्की काय बोलतोय याचा अंदाज बांधता येत नाही. दरम्यान, हा व्हिडिओ जेव्हा काढण्यात आला तेव्हा मनी किक्स तेथे नव्हता. दुबई कन्ट्रक्शन मोगुल सैफ अहमद बेल्हासा याचा मुलगा असलेल्या मनी किक्सने काही दिवसांपूर्वीच सलमानची भेट घेतली होती.

वाचा : प्रेमासाठी ‘या’ अभिनेत्रीने सोडलेली चित्रपटसृष्टी

‘एक था टायगर’ या चित्रपटाचा ‘टायगर जिंदा है’ हा सिक्वल आहे. गणेश चतुर्थी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा ‘भाईजान’ चित्रीकरणातून काही दिवसांची सुट्टी काढणार असून, तो मुंबईला परतणार आहे. जेणेकरून आपल्या कुटुंबासह तो गणेशोत्सव साजरा करू शकेल. दरवर्षी सलमानच्या घरी गणरायाचे आगमन होते. गेल्यावर्षी तो ‘ट्युबलाइट’च्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे त्याला कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी असे होणार नाही. यावेळेस तो गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंत घरीच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 5:49 pm

Web Title: video salman khan checks out spectacular ferrari of the richest 15 year old money kicks in dubai
Next Stories
1 VIDEO : अतिउत्साही चाहत्याला ‘या’ अभिनेत्याने लगावली चपराक
2 प्रेमासाठी ‘या’ अभिनेत्रीने सोडलेली चित्रपटसृष्टी
3 हातात एकही चित्रपट नसताना करिष्मा कमवते कोट्यवधी रुपये!
Just Now!
X