21 January 2018

News Flash

VIDEO : संजूबाबा मुलांसोबत बॅडमिंटन खेळतो तेव्हा..

त्याला मान्यता या तिसऱ्या पत्नीपासून शाहरान आणि इकरा ही जुळे मुले आहेत.

मुंबई | Updated: October 3, 2017 5:21 PM

संजय दत्त, शाहरान दत्त, इकरा दत्त

कामासोबतच आपल्या कुटुंबालाही तितकेच महत्त्व देणाऱ्या कलाकारांमध्ये फार कमी अभिनेत्यांचा समावेश होतो. अक्षय कुमार, आमिर खान, शाहरुख खान हे अभिनेते आपल्या मुलांची किती काळजी घेतात हे वेळोवेळी आपल्याला दिसून आलंय. त्याचसोबत संजय दत्तचेही त्याच्या जुळ्या मुलांवर असलेले प्रेम लपून राहिलेले नाही.

वाचा : अतिरेकी हल्ल्यानंतर २१५ कोटींच्या चित्रपटाचा प्रीमियर रद्द

सध्या संजूबाबा ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’च्या चित्रीकरणासाठी बिकानेर येथे गेला आहे. मात्र, केवळ कामातच बुडून न राहता त्याने आपल्या सहा वर्षीय शाहरान आणि इकरा या मुलांनाही वेळ देण्याचे ठरवले. ही दोन्ही मुले सध्या त्यांच्या बाबासोबत बिकानेरमध्येच आहेत. तेव्हा कामातून वेळ काढून संजूबाबाने आपल्या मुलांना बॅडमिंटनचे धडे दिले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याने लिहिलंय की, ‘माझे बाबा चित्रीकरणासाठी बाहेरगावी जायचे तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत असाच वेळ घालवायचो. आज त्याच दिवसांची आठवण येतेय.’ २००५ साली सुनील दत्त यांचे निधन झाले होते.

वाचा : ‘पद्मावती’चे पोस्टर पाहून जॉनने घेतला मोठा निर्णय!

संजयने मान्यतासोबत २००८ साली लग्न केले. पहिल्या पत्नीपासून त्याला त्रिशाला ही मोठी मुलगी असून मान्यता या तिसऱ्या पत्नीपासून शाहरान आणि इकरा ही जुळे मुले आहेत.

तुरुगांतून बाहेर आल्यानंतर संजूबाबाने ‘भूमी’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. यात आदिती राव हैदरीने त्याच्या मुलीची भूमिका केली. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या वडिलांची भूमिका त्याने लीलया साकारली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करण्यास यशस्वी झाला नसला तरी संजयच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलंय.

First Published on October 3, 2017 5:21 pm

Web Title: video sanjay dutt plays badminton with his kids shahraan and iqra
  1. No Comments.