छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंब-या आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. त्यांच्यावर आजवर काही मालिका आणि चित्रपटही येऊन गेले. आता पुन्हा एकदा महाराजांची ही शौर्यगाथा पडदयावर पाहण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळणार आहे.

डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंतपणे उभा करणारा ‘शिव छत्रपती’ ह्या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शिव छत्रपती’च्या ट्रेलरमध्ये वीएफएक्सचा बराचसा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो.  शिव छत्रपतीमध्ये उदय सोनवणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘शिव छत्रपती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साहस बर्फे याने केले आहे. तर अमृता कदम हिने चित्रपटाची कथा लिहिली असून धनंजय शिळीमकरने कला दिग्दर्शन केले आहे. ग्रे पार्क स्टुडिओचे संगीत लाभलेला “शिव छत्रपती” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
shahu chhatrapati marathi news, bhagat singh sukhdev rajguru kolhapur marathi news
शहीद दिनानिमित्त शाहू महाराजांचे अभिवादन

सध्या ‘शिव छत्रपती या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली असून हा चित्रपट पहिल्या टिझरमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण केली आहे. ‘शिव छत्रपती’ चित्रपटाचा १९ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात हा ट्रेलर सव्वा लाखपेक्षाही अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारे मावळे सुद्धा या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.