19 October 2019

News Flash

Video : तुम्हारी अदा पे! सुष्मिताचे शास्त्रीय नृत्य पाहिले का?

सुष्मिताने तिच्या करिअरसोबतच तिची आवड आणि छंददेखील जोपासल्याचं पाहायला मिळालं आहे.

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन चित्रपटांपासून चार हात लांब राहत असली तरी सोशल मीडियावरील मोठ्या प्रमाणावर अँक्टीव्ह असते. सुष्मिता २०१० मध्ये एका चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटातून फारकत घेतली. मात्र सध्या डान्सच्या एका व्हिडिओमुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सुष्मिताच्या या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यात ती शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेताना दिसून येत आहे.

सुष्मिताने तिच्या करिअरसोबतच तिची आवड आणि छंददेखील जोपासल्याचं पाहायला मिळालं आहे. सुष्मिता सेनलाही अभिनयाव्यतिरिक्त डान्सची आवड आहे. त्यामुळे अनेक वेळा ती सोशल मीडियावर आपले डान्सचे काही व्हिडिओज शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती कथ्थक करताना दिसत आहे. सुष्मिताचा हा व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असून या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

गेल्या २५ वर्षांपासून सुष्मिता कथ्थक शिकत आहे. त्यामुळे अभिनयासह कथ्थक नृत्यामध्येही ती पारंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिताने नृत्याचा सराव करताना घेतलेली प्रचंड मेहनतही दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सुष्मिता मॉडेल रोहमन शॉलसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.विशेष म्हणजे ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या दोघांनी याविषयी मौन बाळगणं पसंत केलं आहे.

First Published on January 12, 2019 11:37 am

Web Title: video sushmita sen learning kathak