अॅण्ड द मिस युनिव्हर्स इज मिस कोलंबिया…. सॉरी मिस फिलिपिन्स. तुम्हीही गडबडलात ना. नक्की मिस युनिव्हर्स झाली तरी कोण?
यंदाचा विश्वसुंदरीचा किताब मिस फिलिपिन्सने पटकाविला आहे. मात्र, काही वेळासाठी विश्वसुंदरीचा मुकुट मिस कोलंबियाच्या डोक्यावर झळकला होता. पण काही क्षणात सूत्रसंचालकाच्या चुकीमुळे विश्वसुंदरी स्पर्धेच्या निकालाला नाट्यमय स्वरुप आले. झाले असे की, सूत्रसंचालकाने नावाचा घोळ घातल्याने काही क्षणासाठी का होईना मिस कोलंबिया अरिअदना गुटिरर्ज अरेविलो हिला मिस युनिव्हर्स झाल्याचा मान मिळाला. सर्वांकडून तिचे कौतुकही करण्यात आले. मात्र, काही क्षणांतच तिचा हा संपूर्ण आनंद विरला. कारण, सूत्रसंचालकाने अचानक सर्वांची माफी मागितली. कोणाला काही कळलेच नाही की सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे हा माफी का मागत आहे. त्यानंतर त्याने विश्वसुंदरीच्या किताबासाठी मिस फिलिपिन्सच्या नावाची घोषणा केली. या सर्व नाट्यमय कार्यक्रमात मिस कोलंबियाला तर दुःख झालेच पण खरी विश्व सुंदरी झालेल्या मिस फिलिपिन्सलाही तिचा आनंद व्यवस्थित व्यक्त करता आला नाही. आपल्या या चुकीसाठी सूत्रसंचालक स्टीव्हने दिलगिरी व्यक्त करत म्हटले की, मी योग्य नाव वाचले नाही ही संपूर्णपणे माझी चुकी आहे. पिया अलोंजो ही यंदाची विजेती असून अरिअदना ही उपविजेती आहे.
Miss Universe Pageant

मिस युनिव्हर्सच्या किताबासाठी ८० देशांतील १९ ते २७ वयोगटातील सुंदरीनी सहभाग घेतला होता.

Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..