12 December 2017

News Flash

VIDEO : ट्विंकलच्या विसरभोळेपणामुळे अक्षय चिंतेत!

आताच्या घडीतील 'पावर कपल'मध्ये या जोडीचा न चुकता उल्लेख केला जातो.

मुंबई | Updated: October 5, 2017 12:10 PM

अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना

सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात घटस्फोट आणि ब्रेकअपच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. मात्र, त्यातही लग्नाला जवळपास १५ वर्षे उलटूनही अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना त्यांचे नाते नव्याने जगत असल्याचे दिसते. आताच्या घडीतील ‘पावर कपल’मध्ये या जोडीचा न चुकता उल्लेख केला जातो. या दोघांच्या स्वभावांमध्ये विसंगती असली तरी जेव्हा प्रेमाचा विषय येतो तेव्हा त्यांच्याकडे ‘मेड फॉर इच अदर’ म्हणूनच पाहिले जाते. योग्य जोडीदार कसे असावेत याचे ते उत्तम उदाहरण आहेत. पण, या दोघांमधील एकजण आपल्या लग्नाचा वाढदिवसच विसरत असेल, तर ….. त्यावेळी आपल्या जोडीदारावर न चिडता ती वेळ कशी हाताळावी हेच या दोघांनी आता दाखवून दिलंय.

वाचा : ..म्हणून भाऊ कदमचे होतेय कौतुक

खिलाडी कुमारने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. लग्नाचा वाढदिवस विसरलेली ट्विंकल यात अक्षयला त्याबद्दल विचारताना दिसते. मात्र, आपल्या आयुष्यातील अतिमहत्त्वाच्या दिवसाची तारीख ट्विंकल कशी विसरू शकते, असा विचार करून रागावण्यापेक्षा तो असं काही करतो ज्यामुळे त्याची ही जोडीदार हा खास दिवस कधीच विसरू शकणार नाही. आपलं जीवापाड प्रेम असणाऱ्या ‘टीना’ने लग्नाचा वाढदिवस विसरू नये म्हणून तो तिला खास भेट देतो. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलंय की, प्रेमाची काही किंमत नसते, पण काही गोष्टींच्या माध्यमातून प्रेम खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येते.

वाचा : ‘निर्मात्यांसोबत ‘ते’ करण्यास तयार होणाऱ्या स्त्रियांचा मला राग येतो’

एका जाहिरातीसाठी हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला असला तरी अक्षय आणि ट्विंकलच्या डोळ्यातील एकमेकांसाठी असलेले प्रेम यात स्पष्ट दिसून येते. दरम्यान, अक्षय सध्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारतोय. लवकरच तो सोनम कपूर, राधिका आपटेसोबत ‘पॅडमॅन’ तर मौनी रॉयसोबत ‘गोल्ड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले.

You can't put a price tag on love but some things just help you express it a little better 🙂 @pc_jeweller

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

First Published on October 5, 2017 12:06 pm

Web Title: video twinkle khanna forgetting the wedding anniversary has left akshay kumar worried