१९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. कारण त्या दिवशी काश्मिरी पंडितांना खोरं सोडून बाहेर जावं लागलं आणि आपल्याच देशात शरणार्थी होऊन जगावं लागलं. काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आता ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. विधू विनोद चोप्रा यांचा ‘शिकारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वाचा खुलासा केला.

पाहा मुलाखत- 

‘शिकारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून आदिल खान आणि सादिया हे दोघं कलाविश्वात पदार्पण करत आहेत. शिवकुमार आणि शांती या दोन भूमिका हे दोघं साकारत आहेत. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.