१९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. कारण त्या दिवशी काश्मिरी पंडितांना खोरं सोडून बाहेर जावं लागलं आणि आपल्याच देशात शरणार्थी होऊन जगावं लागलं. काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आता ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘शिकारा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात विधू विनोद चोप्रा म्हणाले, “आज होत असलेल्या आणि ३० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा मी निषेध करतो.” जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये भावनांच्या चढउतारांमधून जाणारी प्रेमकथा आणि त्यादरम्यान काश्मीर खोऱ्यात पसरलेला हिंसाचार यावर कथा अधोरेखित करण्यात आली आहे.

आणखी वाचा : भारतीय आहेस का विचारणाऱ्याला तापसीचं सडेतोड उत्तर 

या चित्रपटाच्या माध्यमातून आदिल खान आणि सादिया हे दोघं कलाविश्वात पदार्पण करत आहेत. शिवकुमार आणि शांती या दोन भूमिका हे दोघं साकारत आहेत. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.