News Flash

विद्या रणबीरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार

रणबीर सध्या 'जग्गा जासूस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री विद्या बालन आणि रणबीर कपूर

अभिनेत्री विद्या बालन ‘बेगम जान’ चित्रपटातील अनोख्या भूमिकेनंतर आगामी चित्रपटासाठी सज्ज झालीय. विद्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटातून अभिनेता मानव कौलसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडमधील आणखी एक आघाडीचा कलाकार झळकणार असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यासोबत या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर देखील दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे तो नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झालेले नाही. पण, पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीरची भूमिका ही विद्याच्या व्यक्तिरेखेशी कनेक्शन दाखविणारी असणार आहे. त्यामुळे ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटात विद्या आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील.

या चित्रपटात विद्या सुलोचनाची व्यक्तिरेखा साकारत असून ती पुन्हा एकदा रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसेल. तर या चित्रपटात अभिनेता मानव कौल तिच्या पतीची भूमिका साकारताना दिसेल. मानवने ‘सिटीलाइट’, ‘वझीर’, ‘काय पो छे’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही टेलिव्हिजन मालिकांमध्येही त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. रघू राम याच्या ‘आएशा माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये मानव महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

विद्यासोबतच्या या चित्रपटा व्यतिरिक्त रणबीर कपूरआगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. कतरिना आणि रणबीर  ब्रेकअपनंतर दिग्दर्शक अनुराग बासु या जोडीला एकत्र आणत आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसते. या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेत बदल करुन हा चित्रपट १४ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे रणबीरने खुद्द घोषीत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 9:47 pm

Web Title: vidya balan and ranbir kapoor in tumhari sulu
Next Stories
1 आमिर तब्बल १६ वर्षानंतर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार
2 Video: कपिल-सुनीलला एकत्र आणण्यासाठी सिद्धूपाजींनी घातली साद
3 सलमानची ऑस्ट्रेलियात ‘दबंगगिरी’; सोनाक्षीसोबत ठुमके अन् प्रभूदेवासोबत ‘जलवा’
Just Now!
X