25 February 2021

News Flash

स्वस्तात मस्त! विद्या बालनच्या ‘या’ साडीची किंमत आहे तुमच्याही आवाक्यात

विद्या बालनच्या कांजीवरम साडीची किंमत वाचून व्हाल थक्क

कलाविश्व, त्यात वावरणारे सेलिब्रिटी त्यांचं लाइफस्टाइल हा विषय कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेला आहे. अनेकांना या सेलिब्रिटींच्या लक्झरी लाइफस्टाइलचा हेवा वाटतो. त्यामुळे या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यातच अनेक सेलिब्रिटी त्यांच्या महागड्या वस्तू, कपडे, बॅग्स यांच्यामुळे चर्चेत असतात. यात सध्या चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री विद्या बालनच्या महागड्या साडीची.

अत्यंत सहजसुंदर अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकणारी विद्या कायमच तिच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीचा बडेजावपणा न करता अत्यंत साध्या पद्धतीने विद्या तिचं जीवन जगते. त्यामुळे विद्या अनेकांची गुणी अभिनेत्री असण्यासोबतच अनेकांची आवडती कलाकार आहे. तर, सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत असून सध्या तिच्या साडीची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे तिची ही साडी कमी किंमतीची असल्यामुळे ही चर्चा होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

अनेकदा अभिनेत्री त्यांच्या डिझायनर किंवा महागड्या साड्यांमुळे चर्चेत येतात. मात्र, विद्या तिच्या कमी किंमतीच्या साडीमुळे चर्चेत आली आहे. विद्याने काळ्या रंगाची सिल्क कांजीवरम साडी परिधान केली असून या साडीची किंमत २५ हजार ९५० रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ प्रदर्शनापूर्वीच वादात; ‘त्या’ पोस्टरप्रकरणी रिचाने मागितली माफी

दरम्यान, विद्याने मुहुर्त या ब्रॅण्डची साडी परिधान केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सध्या अनेक अभिनेत्री बिकीनी परिधान करुन चर्चेत येत असल्या तरीदेखील विद्या साडीमध्ये तिचं सौंदर्य जपत चर्चेत राहत आहे. द डर्टी पिक्चर या चित्रपटामुळे विद्या खऱ्या अर्थाने नावाला आली आणि याच चित्रपटातून तिने तिच्या अन्य भूमिकांना छेद देत स्वत: मधून अभिनय कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 10:19 am

Web Title: vidya balan in rs 26k kanjivaram black silk saree looks drop dead gorgeous ssj 93
Next Stories
1 ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ प्रदर्शनापूर्वीच वादात; ‘त्या’ पोस्टरप्रकरणी रिचाने मागितली माफी
2 प्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास
3 सैफ अली खानची ‘तांडव’ वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात
Just Now!
X