11 December 2017

News Flash

शाहरूखला नाराज करणारं विद्या बालनचं हे वक्तव्य

एसआरकेबद्दल काय म्हणाली विद्या?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 1:39 PM

विद्या बालन, शाहरुख खान

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली. नेहा आणि विद्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. शूटिंगदरम्यानच दोघींमध्ये चांगली मैत्री जमली. याचाच फायदा नेहाला तिच्या टॉक शोसाठी झाला असं म्हणावं लागेल. कारण विद्याने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने दिली. यावेळी खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टी तिने सांगितल्या. मात्र एसआरकेसंदर्भात तिने केलेलं वक्तव्य सध्या सर्वांचंच लक्ष वेधतंय.

‘मी चांगल्या दिसणाऱ्या एसआरकेसोबत राहते, हे मला कळून चुकलंय. तो पृथ्वीवर सर्वांत चांगला दिसणारा माणूस आहे आणि त्याच्यासोबत मी आहे याचा मला आनंद आहे,’ असं विद्या म्हणाली. आता एसआरके म्हटल्यावर विद्या शाहरूख खानबद्दल बोलत आहे, असं तुम्हाला वाटलं असेल. पण इथे शाहरुख नाही तर विद्या तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबद्दल बोलत आहे. त्यामुळे शाहरुखपेक्षाही सिद्धार्थ चांगला दिसतो असं विद्याला म्हणायचंय का, असा प्रश्न अनेकांनाच पडला आहे.

PHOTO : विराट-आमिरची ‘ग्रेट भेट’

दरम्यान, विद्या तिच्या आगामी ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. त्याआधी तिचा ‘बेगम जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नव्हता. मात्र या चित्रपटात विद्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकसमीक्षकांकडून प्रशंसा करण्यात आली होती.

First Published on October 4, 2017 1:39 pm

Web Title: vidya balan made a statement which might upset shah rukh khan