01 March 2021

News Flash

आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं ‘माँ पहेली’ प्रदर्शित

शकुंतला देवीमधील तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी शकुंतला देवी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या ३१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली आहे. यातच आता चित्रपटातील तिसरं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘माँ पहेली’ असे या नव्या गाण्याचे बोल असून हे शकुंतला देवीमधील तिसरं गाणं आहे. यापूर्वी ‘पास नहीं तो फेल नहीं’ आणि ‘रानी हिंदुस्तानी’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. त्यानंतर माँ पहेली हे तिसरं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं असून यात शकुंतला देवी आणि त्यांच्या मुलीमधील नात्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. तर सचिन-जिगर यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. तसंच प्रिया सरैया यांनी या गाण्याची रचना केली आहे.

दरम्यान, या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिका साकारत आहे. तर ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका वठवत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 3:41 pm

Web Title: vidya balan movie shakuntala devi new song maa paheli release ssj 93
Next Stories
1 प्राजक्ता माळी म्हणतेय, मी लॉकडाउन फळलेली कलाकार, जाणून घ्या कारण…
2 “सुशांत मृत्यूप्रकरणी FIR दाखल करा”; भाजपा आमदाराची उद्धव ठाकरेंना विनंती
3 लॉकडाउनमध्ये जुगार खेळणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक
Just Now!
X