दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव शकुंतला देवी असं आहे. ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेमा एक्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येवर भाष्य केलं. सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडला जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही, असं ती म्हणाली.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

नेमकं काय म्हणाली विद्या बालन?

“सुशांतचा मृत्यू ही नक्कीच एक दुदैवी घटना आहे. मात्र या घटनेचे सनसनाटीकरण थांबवा. यामध्ये बॉलिवूडचा दोष नाही. किंबहूना कोणाचाही दोष नाही. त्याच्यासोबत नक्की काय घडलं? त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत आपल्याला अद्याप काहीही माहित नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे पुराव्यांअभावी अर्धवट माहितीच्या आधारावर कोणावरही आरोप करणं योग्य नाही.” असं मत विद्याने या मुलाखतीत व्यक्त केलं.

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस त्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांची चौकशी करण्यात आली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.