News Flash

विद्या बालनने सांगितले बेडरुम सीक्रेट

तिने करण जोहरच्या चॅट शोमध्ये खुलासा केला आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिने आजवर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामधील काही चित्रपट हिट देखील ठरले. चित्रपटांसोबतच विद्या ही तिच्या खासगी आयुष्मामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी विद्या बालनने एका शोमध्ये तिच्या बेडरुमधील सीक्रेट सांगितले होते.

विद्या बालनने करण जोहरच्या ‘करण जोहर चॅट शो’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामधील अनेक गोष्टींचा खुलासा करताता. आता पाहुणी म्हणून आलेल्या विद्या बालनने तिचे बेडरुम सीक्रेट करण जोहरसोबत शेअर केले आहे.

आणखी वाचा : ‘तुम्ही सर्व जबाबदार आहात..’, करोना नियम मोडणाऱ्यांवर संतापली करीना

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

आणखी वाचा : ‘शाहरुखने माझे आयुष्य उध्वस्त केले’, तरुणीने केला मजेशीर आरोप

करण जोहरने बेडरुम सीक्रेटबद्दल विचारताना विद्याला म्हटले, ‘तुला बेडरुममधल्या लाइट चालू ठेवायला आवडतात का?’ त्यावर विद्याने मसा अंधुक प्रकाश आवडतो असे उत्तर दिले. त्यानंतर करणने विचारले, तुला बेडरुमध्ये गाणी लावणं किंवा मेणबत्ती लावायला आवडते का? विद्याने यावर, हो मला दोन्ही गोष्टी आवडतात असे म्हटले. तसेच तिला कॉटनची बेडशीट जास्त आवडते असे देखील विद्या म्हणाली.

पुढे करणने विद्याला ‘तुला बेडवर पडल्यानंतर काय आवडते? चॉकलेट, ग्रीन टी?’ त्यावर विद्याने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘पाणी. मला सगळ्यात आधी पाणी हवे असते’ असे विद्या म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 2:47 pm

Web Title: vidya balan shares her bedroom secrets in karan johar chat show avb 95
Next Stories
1 प्रसुतीच्या ७ दिवस आधी अभिनेत्रीला करोनाची लागण, “तो काळ माझ्यासाठी..”
2 अभिमानास्पद! करोना रुग्णांच्या मदतीसाठी सुपरस्टार बनला रुग्णवाहिका चालक
3 फोटो काढायला आलेल्या चाहत्यावर संतापली सारा, जाणून घ्या कारण
Just Now!
X