News Flash

या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’

उद्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘शकुंतला देवी’ हा देखीस अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक समोर आली आहे.

विद्या बालनने सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने ‘गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांना भेटायला तयार रहा. चित्रपटाचा ट्रेलर १५ जुलै प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपट ३१ जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइमच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचे दोन मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहेत.

विद्या बालनचा हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.

या पूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता. आता ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘सडक २’, ‘लूटकेस’, ‘भूज’, ‘खुदा हाफिज’, ‘दिल बेचारा’, ‘बिग बूल’ हे चित्रपट डिझनी हॉटस्टावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या चित्रपटांचे प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 5:36 pm

Web Title: vidya balan starrer shakuntala devi will release on july 31 on amazon prime video avb 95
Next Stories
1 रेखा यांच्या बंगल्यानंतर झोया अख्तरची इमारतही केली सील
2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टवरून केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
3 पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल
Just Now!
X